"विश्राम गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विश्राम गुप्ते हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. ते मुळचे नागपूर...
(काही फरक नाही)

१०:३९, २७ मार्च २०१९ ची आवृत्ती

विश्राम गुप्ते हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. ते मुळचे नागपूरचे असून गेल्या २० वर्षांपासून ते गोवा येथे स्थायिक झाले आहेत. म्हापसा येथील बांदेकर कॉलेज मधील आपली शिक्षकाची नोकरी सोडून ते चार वर्षांसाठी सौदी अरेबियात गेले होते. तेथील वास्तव्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरातील स्त्री-पुरुष, त्यांचे जगणे, व्यथा अशा अनेक बाबी त्यांच्या लिखाणात पहायला मिळतात.

विश्राम गुप्ते यांनी लिहिलेली पुस्तके

  • अल् तमीर (ऐतिहासिक कादंबरी)
  • ईश्वर डॉट कॉम (विनोदी कादंबरी)
  • चेटूक (कादंबरी)
  • नवं जग नवी कविता
  • नारी डॉट कॉम (कादंबरी)
  • परीकथा आणि वास्तव (ललित)
  • People (अनुवादित, मूळ पुस्तक 'माणसं' लेखक - अनिल अवचट)
  • मेलेल्यांची गढी (अनुवादित, मूळ लेखक - फ्योदोर दस्तयेवस्की)

पुरस्कार

  • पवन वर्मा यांच्या “The great Indian middle class’ या पुस्तकाच्या 'आपला थोर मध्यमवर्ग' या अनुवादासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.