"सूर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६२:
 
==सूर्याचे चुंबकीय क्षेत्र==
 
सूर्याला स्वतःचे चुंबकीय क्षेत्र आहे. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र साधारण पट्टीचुंबकाच्या प्रकारचे आहे. पण सूर्य हा वायूंचा गोळा असल्यामुळे त्यात पुढे क्लिष्टता निर्माण होते. सूर्याच्या चुंबकीय रेषा या वायूंमधे अडकल्या आहेत. सामान्य वापरातले उदाहरण बघायचे झाले तर इलॅस्टिक ज्याप्रकारे कापडामधे शिवून अडकवले जाते, साधारण तशाच प्रकारे या चुंबकीय रेषा वायूंमधे अडकल्या असतात. कापड जसे फिरवले जाते तसे इलॅस्टिक फिरते. चुंबकीय क्षेत्राची क्लिष्टताही अशाच प्रकारे निर्माण होते. चुंबकीय रेषा सूर्याच्या पृष्ठभागावरही असतात. जिथे त्या तुटतात तिथे पृष्ठभागाचे तापमान कमी होते. कारण खालच्या भागातून अभिरसणाच्या बुडबुड्यांमधून येणारी ऊर्जा तुटलेल्या चुंबकीय रेषांमुळे अडवली जाते. त्या ठरावीक भागापर्यंत कमी ऊर्जा आल्यामुळे हा भाग तुलना करताना (कॉन्ट्रास्टमुळे) काळपट दिसतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान ६००० केल्व्हिन असतं तर या काळ्या भागात साधारण ३००० केल्व्हिन. या काळ्या भागाला [[सौर डाग]] (sun spot) म्हणतात.
 
साधारणतः एक सौर डाग पृथ्वीच्या आकाराशी तुलना करता येईल एवढा मोठा असतो. उजव्या बाजूच्या चित्रात तुलनेसाठी सौर डाग आणि पृथ्वी एकाच स्केलवर दाखवले आहेत. चित्राच्या मध्याच्या जवळ असणारा हा डाग सरासरी आकाराचा आहे. सौर डागांच्या मधोमध गडद भाग असतो ज्याला umbra आणि फिकट भागाला penumbra असे म्हणतात. या डागाच्या मध्यातून तंतूसारख्या बाहेर आलेल्या काळ्या रेषा दिसत आहेत. या काळ्या रेषाची चुंबकाभोवती लोखंडाचे कणांची रचना असते, त्याच प्रकारची दिसते. सौर डागांमधे चुंबकीय क्षेत्राचे योगदान त्यातूनच लक्षात यावे. चित्रात मध्याच्या उजव्या बाजूला एक मोठा सौर डाग दिसत आहे आणि त्याच्या खाली एक छोटा डाग आहे. अनेक छोटे डाग एकत्र येऊन कधी कधी असा मोठा आणि अतिशय गुंतागुंतीची रचना असणारा मोठा सौर डाग तयार होतो.
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF&action=edit&section=3
 
==सूर्यग्रहण==
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येऊन चंद्राने पृथ्वीवरून दिसणारा सूर्याचा दर्शनी भाग (अंशतः वा संपूर्ण) झाकला की सूर्यग्रहण होते. अशी स्थिती अमावास्येला होत असल्याने सूर्यग्रहण फक्त अमावास्येला होऊ शकते. अर्थात प्रत्येक अमावास्येला ग्रहण नसते.
 
सूर्याला [[राहू]] किंवा [[केतू]] यांपैकी एखाद्या राक्षसाने गिळले की सूर्याला ग्रहण लागते, अशी सांस्कृतिक कविकल्पना आहे. सूर्य हा [[राहू]] किंवा [[केतू]], या भारतीय ज्योतिर्विज्ञांनी ग्रह म्हणून मानलेल्या पृथ्वीच्या भ्रमणकक्षेवरील दोन बिंदूंपैकी एका बिंदूवर अाला की सूर्यग्रहण होते, या तथ्यावर ही सांस्कृतिक कविकल्पना बेतली आहे.
 
सूर्यग्रहणकालाच्या चार स्थिती असतात. <br/>
१. स्पर्श काळ - <br/>
२. सम्मीलन काळ - <br/>
३. उन्मीलन काळ -<br/>
४. मोक्ष काळ
 
== मानवी संस्कृतीतील सूर्याचे स्थान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सूर्य" पासून हुडकले