"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६८:
==[[नक्षत्र]]==
नक्षत्रे आणि राशी म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]], [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडलेले असतात. त्या एका भागाला रास किंवा [[राशी]] म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ [[नक्षत्र|नक्षत्रे]] होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. सव्वा दोन नक्षत्रांची एक राशी होते.
 
मृग, चित्रा आणि घनिष्ठा या नक्षत्रांना द्विपाद नक्षत्रे म्हणतात. भद्रा तिथीला यांपैकी एखादे नक्षत्र असेल तर द्विपुष्कर योग होतो.
 
कृतिका, पुनर्वसु, पूर्वा(फाल्गुना), उत्तराषाढा आणि पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रांचे तीन पाय एका राशीत आणि चौथा पाय पुढच्या राशीत असतो म्हणून यांना त्रिपाद नक्षत्रे म्हणतात. ज्या दिवशी भद्रा तिथी अधिक मंगळवार, शनिवार किंवा रविवार यांपैकी एक वार व एखादे त्रिपाद नक्षत्र असेल तर त्रिपुष्कर योग होतो.
 
==योग==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले