"कपिलाषष्ठी योग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कपिलाषष्ठी योग हा दुर्मीळ असून, हा साधारणपणे दर साठ वर्षानी एकदा येतो आणि म्हणूनच इतर योगांच्या तुलनेत त्याला `दुर्मीळ' हे विशेषण लावले जाते. भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीच्या वेळी सूर्य हस्त नक्षत्रात असेल, व्यतिपात योग असेल, मंगळवार (किंवा रविवार असेल) व चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर त्या षष्ठीला `कपिलाषष्ठी' असे म्हणतात. या सर्व गोष्टी एकत्र जमून येणे महाकठीण. परंतु साधारणतः दर साठ वर्षानी या गोष्टी एकत्र येण्याची शक्यता असते.
 
एखादी तथाकथित दुर्मिळातली दुर्मीळ घटना घडली की कपिलाषष्टीचा योग आला असे म्हणतात.
 
 
पहा : [[कपिला षष्ठी]]
 
 
हा हिंदू पंचांगातील एक अत्यंत दुर्मीळ योग आहे. साधारण ६० वर्षांतून एकदा हा योग येतो. कपिला षष्ठी योग घडण्यासाठी खालील सहा गोष्टी आवश्यक आहेत.
 
भाद्रपद महिना
कृष्ण पक्षातील षष्ठी
मंगळवार
चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये
सूर्य हस्त नक्षत्रामध्ये
व्यतिपात योग
 
मागील कपिला षष्ठी योग २ ऑक्टोबर २००७ रोजी भारतात सकाळी ६:२० ते ६:५० ह्या वेळेदरम्यान आला होता.
 
ह्या षष्ठीचे दिवशी हस्तनक्षत्रींचा सूर्य असल्याने अतिमहाफल मिळते. ह्या कपिलाषष्ठीचा योग सूर्यपर्व आहे. शास्त्रवचनानुसार हा योग दिवसाचाच घेतात, रात्रीचा घेत नाहीत. ह्या दिवशी होम, दान वगैरे केले असतां कोटी कोटी पुण्य मिळते अशी समजूत आहे. परंतु ह्या दिवशी कधीही श्राद्ध करू नये, असे सांगितले जाते.