"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८५:
 
==करण==
करण हादेखील असाच कालावधी आहे. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. अशी एकूण सात करणे आहेत. बल, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टी. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे पुढचे करण. ही करणे चर म्हणजे गतिशील असून, एका पाठोपाठ एक अशी येतात.

शिवाय अजून ४ करणे आहेत. ती स्थिर आहेत. वद्य चतुर्दशीच्या उत्तरभागी येणारे शकुनी; अमावास्येच्या पूर्वभागी चतुष्पाद; उत्तरभागी नाग आणि प्रतिपदेच्या पूर्वभागी येते ते किंस्तुघ्न, अशी ही जास्तीची चार करणे आहेत.
 
विष्टि हे या ११ करणांपैकी ७वे करण. याचेच नाव भद्रा. हे करण सदैव गतिशील असते. विष्टि करण असलेला भद्रा काल (नाव भद्रा असले तरी) अशुभ समजला जातो. पंचांगात याचा प्रारंभ आणि समाप्तिकाल देण्याचा परिपाठ आहे. त्यांना अनुक्रमे भद्रा प्रवृत्ती आणि भद्रा निवृत्ती असे म्हणतात. पंचांगात हा काल भ.प्र. आणि भ.नि. अशा संक्षिप्त रूपात दर्शवतात.
 
==कथा==
पुराणांनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. शनीप्रमाणेच ही तापट आहे. भद्रेचा स्वभाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रह्मदेवाने तिला विष्टि करणात स्थान दिले आहे.
 
==ज्योतिषीय संकल्पना==
ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळ्या राशींनुसार भद्रा ही स्वर्ग, नरक व पृथ्वी या तिन्ही लोकांत फिरते. जेव्हा चंद्र हा कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असतो आणि विष्टि करण असते, तेव्हा भद्रा ही पृथ्वीलोकात असते आणि या काळात शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.
 
==प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले