"गुरुपुष्य योग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य य...
(काही फरक नाही)

२०:३८, १७ मार्च २०१९ ची आवृत्ती

ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषत: सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते.

महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते.

सन २०१८चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ आॅगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ आॅक्टोबर.
सन २०१९चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ आॅगस्ट
सन २०२०चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर.

यावरून असे दिसते की पहिले तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो.