"आश्लेषा महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आश्लेषा महाजन ह्या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. वर्तमानपत्र...
(काही फरक नाही)

१७:२३, २६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

आश्लेषा महाजन ह्या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. वर्तमानपत्रांतून त्यांचे विविध विषयांवरील लेख आणि सदर लेखन सातत्याने प्रकाशित होत असते.

पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम ३० जुलै २०१८ रोजी झाला होता.

आश्लेषा महाजन यांची पुस्तके

  • अतिदूरचे बांधव (अनुवादित, मूळ लेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
  • एकदम सही (बालसाहित्य)
  • एक पानी आरस्पानी भाग - १, २ (१५४ + १५४ ललित लेख; सदरलेखन संग्रह)
  • कळ्यांचे ऋतू (ललित)
  • कार्टून कार्टी (बालसाहित्य)
  • गप्पूला नाचता येईना (अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखिका - मेनका रामन)
  • चित्रांचा खेळ (अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखक - अनिता मूर्ती)
  • टाईम प्लीजऽऽ (बालसाहित्य)
  • नंदिनी कुठे आहे? (अनुवादित बालसाहित्य, मूळ लेखिकका - अनिता मूर्ती)
  • मित्रा, सांगते 'आपली'च गोष्ट (कादंबरी)
  • मी काय करू? (बालकां-पालकांसाठी मार्गदर्शक)
  • रुजवाई (ललित, वैचारिक)
  • School दुनिया : शाळेच्या कविता, धमाल Songs (बालकविता; सहलेखक - श्रीनिवास शारंगपाणी)
  • स्वप्नजा स्वप्नाळू (बालसाहित्य)

सन्मान आणि पुरस्कार