"म.सु. पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्राचार्य '''मधुकर सु. पाटील''' ([[इ.स. १९३१]]:[[अलिबाग]], [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]]) हे एक मराठी काव्यसमीक्षक असून वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधने नव्हती.
 
त्या वेळच्या [[व्हर्नाक्‍युलर फायनल]]च्या परीक्षेत [[कुलाबा जिल्हा|कुलाबा जिल्ह्यातून]] मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पाटील [[मुंबई]]ला आले. वडील [[वरळी]] कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.
ओळ ५:
वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले.
 
शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे [[मनमाड महाविद्यालय|मनमाड महाविद्यालयात]] आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते. मनमाडला प्राचार्य असताना त्यांनी लिहिण्याची ऊर्मी असलेल्यांना नियतकालिक चालवण्यासाठी चालना दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘अनुष्टुभ’ हे नियतकालिक सुरू झाले व अल्पावधीतच दर्जेदार नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले.
 
म.सु. पाटील यांच्या पत्‍नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका [[नीरजा]] या त्यांच्या कन्या आहेत.
ओळ २१:
 
==पुरस्कार==
* ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षाग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१८)
 
{{DEFAULTSORT:पाटील, म.सु}}