"बलिप्रतिपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
==आख्यायिका==
हा असुरराज बली म्हणजे बळीराजा नव्हे. शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे. त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणून "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे!
 
शेतकऱ्याचा मित्र बळीराजा म्हणजे बलराम...आपल्याकडे मुद्दाम काही जातिद्वेष्ट्यांनी असुरराज बळी हाच शेतकऱ्याचा मित्र असल्याचे खोटे पसरविले आणि बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला. बलरामाच्या हाती नांगर आणि मुसळ ही शस्त्रे आहेत. तीच आयुधे शेतकऱ्याची असतात ना...? बळी, राम, बली, संकर्षण आदी अनेक नावांनी बलराम ओळखले जातात. इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो हे रोज सायंकाळी म्हटले जात असे, केवळ बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्हे. पण ठासून खोटे बोलले व पसरविले जाते...बलराम हे द्वारकेचे महाराज होते. त्यांच्या काळात द्वारका हे संपन्न नगर होते. ते प्रजेची काळजी घेणारे होते. म्हणून त्यांचे राज्य येवो, ही प्रार्थना...पण आर्य-अनार्य सारखा जगात बाद झालेला इतिहास आपल्याकडे अद्याप चघळला जातो. त्यातून हे खोटे निपजते. प्रत्यक्ष भगवंत हे बलरामांची स्तुती करताना काय म्हणतात ते बघा, "आपले स्वरूप अखिल विश्वमय आहे. आपणच सर्व लोकांचा संहार केल्यावर नारायणरूपात स्थिर रहाता. आकाश आपले मस्तक, जल मूर्ती, पृथ्वी पाय, अग्नी मुख, जीवसृष्टीचा जीवनदायिनी वायू आपला उच्छवास आणि चंद्रमा आपले मन आहे. आपले सहस्र मुख, सहस्र शरीर, सहस्र हात-पाय आणि सहस्र नेत्र आहेत. आपण पूर्वकाळात जे दृश्यमान केले तेच देवता पाहत आले आहेत. विश्वात जे काही जाणण्यायोग्य आहे त्याचे आपणच प्रतिपादन केले आहे. एकमात्र आपल्याला जे तत्त्व माहिती आहे ज्याला देवतासुद्धा जाणत नाहीत. देवांनासुद्धा आपण पूर्णपणे कळला नाहीत म्हणून आपल्याला अनंत म्हटले जाते. आपणच सूक्ष्म, महान आणि एक आहात. जसा मी संपूर्ण विश्वाचा अंतर्यामी आहे तसेच आपणही आहात. मी सनातन विष्णू आणि तुम्ही पुरातन शेष आहात. जो मी आहे तेच तुम्ही आहात आणि जे तुम्ही आहात तो सनातन विश्वात्मा मीच आहे "
[श्लोक ३५ ते ४८] (महाभारत- खिलभाग-हरिवंश - विष्णुपर्व-१४ वा अध्याय).
 
तेव्हा बळीराजा म्हणजे असुरराज बळी नसून द्वारकाधीपती बलराम आहेत हे समजून घ्यावे..!!
.
- सच्चिदानंद शेवडे गुरुजी
 
==बाह्यदुवे==