"गुढीपाडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २३:
दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच [[राम]] जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/60-corer/articleshow/33062387.cms|शीर्षक=पाडवा पावला, ६० कोटींची उलाढाल -Maharashtra Times|date=2014-04-01|work=Maharashtra Times|access-date=2018-03-14|language=mr}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/maharashtra-news/shopping-rush-to-buy-on-auspicious-gudi-padwa-2-418370/|शीर्षक=पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी|date=2014-04-01|work=Loksatta|access-date=2018-03-14|language=mr-IN}}</ref>
 
या दिवशी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर [[गुढी]] उभारतात. [[चैत्र शुद्ध प्रतिपदा|चैत्र शुद्ध प्रतिपदा]] हा दिवस [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा [[उगादी]] अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.hindujagruti.org/hindi/hinduism/hindu-festivals/gudhi-padva|शीर्षक=नवसंवत्सरारंभ (गुढीपाडवा) - हिन्दू जनजागृति समिति|work=हिन्दू जनजागृति समिति|access-date=2018-03-14|language=en-US}}</ref>
 
==दोन पाडवे==
महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदेला पाडवा साजरा होत असला, तरी सर्व महाराष्ट्रात तो एकाच दिवशी असेल असे नाही. उदाहरणार्थ, २०१३ साली पुण्या-मुंबईत ६ एप्रिलच्या सूर्योदयाच्या वेळी फाल्गुन अमावास्या चालू होती, ती सकाळच्या सुमारे साडेनऊ वाजता संपली आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. पण ती देखील ७ एप्रिलच्या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधीच संपून द्वितीया सुरू झाली. म्हणजे सूर्योदयाच्या वेळी प्रतिपदा नव्हती, प्रतिपदेचाच म्हणजे पाडव्याचा क्षय झाला होता. मग गुढी कधी उभारणार? त्यामुळे २०१३ साली, एरवी सूर्यॊदयाच्या सुमारास उभारायची गुढी सकाळी साडनऊनंतर उभी करण्याची तोड काढण्यात आली.
 
नागपूर पुण्या-मुंबईच्या उत्तरेला असल्याने उन्हाळ्यात तिथला दिवस जास्त मोठा असतो. असे असल्यामुळे ७ तारखेला नागपूरला सूर्योदय होऊन गेल्यानंतर काही मिनिटांनंतर प्रतिपदा संपून द्वितीया सुरू होणार होती. सूर्योदयाच्या वेळेस प्रतिपदा ही तिथी असल्यामुळे तिथे ७ तारखेलाच चैत्र शुक्ल प्रतिपदा निश्चित होऊन त्या दिवशी गुढी पाडवा आला.
 
म्हणजे महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या दिवशी पाडवे आले.
 
==काठीपूजा==