"संत तुकाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उत्पात काढला.
(चर्चा | योगदान)
ओळ ७६:
== चित्रपट ==
* इ.स.१९३६ मध्ये [[प्रभात फिल्म कंपनी]]च्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत '[[संत तुकाराम (चित्रपट)|संत तुकाराम]]' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या [[Venice Film Festival|व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये]] या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट काढण्यात आले. हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता.
* हा चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर अँडअॅन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.
* १९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक - सुंदराराव नाडकर्णी
* १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या.
* त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे [[श्रीदेवी]] यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती.
* यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'.
* इ.स. २०१३सालचा२०१२सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता.
* तुकारामाच्या आयुष्यावर कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तू माझा सांगाती’ नावाची मालिका ११-७-२०१४पासून सुरू आहे. २१ जून २०१८ रोजी तिचा १२४७वा एपिसोड झाला.
* 'तुका आकाशा एवढा' हा मराठी चित्रपट मध्ये आला. दिग्दर्शक - जितेंद्र वाईकर
 
==तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके==