"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:

समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध.. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत.

==दासबोधाची वैशिष्ट्ये==
दासबोध हा असा एकमेव भारतीय अध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, अशी पठडीतली न होता, एका साहजिक पडणाऱ्या प्रश्नाने होते. ही सुरुवात काही प्रश्नांनी होते.

श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें

जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१||

हा कोणता ग्रंथ आहे? याचे नाव काय? यात प्रामुख्याने काय सांगितले आहे? हा ग्रंथ ऐकून मला काय मिळणार आहे? लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नाचे उत्तर देतात,

ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद |

येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग ||२||

या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. हा ग्रंथ गुरु-शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे, आणि मी यात मुख्यत्वेकरून भक्तिमार्गाचे विस्तृत विवेचन केले आहे.
पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे. ग्रंथाची सुरुवातच इतकी तर्कशुद्ध व विवेकपूर्ण आहे, याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या २ ओव्यांतच पटते.

नवविधा भक्ती म्हणजे काय? खरे ज्ञान म्हणजे काय? वैराग्य कसे असते? अध्यात्म म्हणजे काय या सर्वाचा ऊहापोह मी येथून पुढे केलेला आहे असे सांगत रामदासस्वामी पुढे या ग्रंथाच्या लिखाणासाठी वापरलेल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मोठी यादीच सादर करतात. व या दासबोध ग्रंथातील म्हणणे खोटे सिद्ध करायचे असेल तर वरील सर्व ग्रंथ खोटे मानावे लागतील अशी मेखही मारुन ठेवतात.

दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्याल स्पर्श करणारे अक्षरश: शेकडो विषय येऊन जातात.

पण तो वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला, जन्मापासून पडणाऱ्या खालील काही प्रश्नांची ठोस उत्तरे मिळतात.

१) मी कोण आहे?

२) मी इथे जन्माला का व कसा आलो?

३) माझ्या जन्माचा हेतू काय?

४) देव म्हणजे काय?

५) देव कसा आहे व काय करतो?

६) मूर्तिपूजा खरी आहे का? देव खरेच दर्शन देतो का?

७) आत्मा म्हणजे काय?

८) मृत्यूनंतर जीवाचे काय होते?

९) ही सृष्टी निर्माण कशी झाली?

१०) मुक्ती म्हणजे काय?, वगैरे.

==दासबोधाचे जन्मस्थळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दासबोध" पासून हुडकले