"सृष्टी कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सृष्टी कुलकर्णी (जन्म : इ.स. १९९७) या कॅलिडोस्कोप या मराठी लघुकथासं...
(काही फरक नाही)

२१:१६, १९ जुलै २०१८ ची आवृत्ती

सृष्टी कुलकर्णी (जन्म : इ.स. १९९७) या कॅलिडोस्कोप या मराठी लघुकथासंग्रहाच्या लेखिका आहेत. संग्रहात त्यांनी लिहिलेल्या १७ कथा आहेत.

सृष्टी कुलकर्णी यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान २०१६ सालच्या सुरुवातीला झाले. त्यांनंतर रोगावर मात करीत त्यांनी या कथा लिहिल्या व कथासंग्रह प्रकाशित करवून घेतला.

सृष्टी यांचे मूळ गाव महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात आहे. महाविद्यालयाच्या अभ्यासासाठी त्या नवी मुंबई येथे आपल्या मंगला कुलकर्णी नावाच्या आजीकडे राहतात. न्यू पनवेल शहरातील चंगू काणा ठाकूर काॅलेजात त्या रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी करीत आहेत.

आणखी एक सृष्टी कुलकर्णी

या सृष्टी कुलकर्णी (जन्म : इ.स. २००४) वयाच्या १२व्या वर्षापासून लेखन करीत आहेत. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त नृत्य, चित्रकला आणि संगीत हे त्यांचे छंद आहेत. त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकांची नावे - A TRIP TO SECRET CAVE आणि THE BRAVE KIDS. दोन्ही पुस्तके मुद्रित स्वरूपात आणि 'किंडल'वर उपलब्ध आहेत.