"सुचेता कृपलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) यांचा जन्म अंबाला शह...
(काही फरक नाही)

२२:०६, ३० जून २०१८ ची आवृत्ती

सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार) यांचा जन्म अंबाला शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डाॅ. एस.एन. मुजुमदार. सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत.

सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालय आणि सेन्ट स्टीफन काॅलेजांत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या. त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या. महात्मा गांधींसह समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित लॊकांच्या विरोधाला न जुमानता सुचेतांनी वयाच्या २८व्या वर्षी आचार्य कृपलानींशी लग्न केले. दोघांच्या वयांत २० वर्षांचे अंतर होते.

सुचेता कृपलानी यांच्या आयुष्यातील राजकीय टप्पे

  • १९४० : आॅल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना
  • १९४२ ते १९४४पर्यंत : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत आंदोलन
  • १९४४ : अटक
  • १९४८ : विधानसभेसाठी पहिल्यांदा निवड
  • १९५० ते १९५२ : अस्थायी लोकसभेचे सदस्यत्व
  • संसदेमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला.
  • १९५२ आणि १९५७ : लोकसभेत निवडून गेल्या. याच काळात काही दिवसांसाठी राज्यमंत्रिपद
  • २ आॅक्टोबर १९६३ ते मार्च १९६७ : उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री
  • १९६७ : गोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या
  • १ डिसेंबर १९७४ : निधन

आत्मचरित्र

  • सुचेता अॅन अनफिनिश्ड अाॅटोबायोग्राफी (इंग्रजी)