"हातगेघर-आरळे डोंगररांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हातगेघर-आरळे डोंगररांग ही सह्याद्रीची एक डोंगररांग आहे. सह्याद्...
(काही फरक नाही)

२२:०५, १० जून २०१८ ची आवृत्ती

हातगेघर-आरळे डोंगररांग ही सह्याद्रीची एक डोंगररांग आहे. सह्याद्रीच्या मुख्य श्रेणीपासून पूर्वेस व आग्नेयेस गेलेल्या अनेक डोंगररांगा आहेत. त्यांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे महादेव, कमळगड, वैराटगड, हातगेघर-आरळे, बामणोली-घेरादातेगड, भैरवगड-कांदूर या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांपैकी महाबळेश्वरच्या उत्तरेस आठ किमी.वर सुरू होणारी कमी लांबीची कमळगड ही डोंगररांग असून तिच्यामुळे डावीकडील (उत्तरेकडील) वाळकी व उजवीकडील (दक्षिणेकडील) कृष्णा हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले आहेत. वैराटगड ही डोंगररांग महाबळेश्वर पठारापासून सुरू होऊन पूर्वेस गेलेली आहे. या रांगेतूनच वाई-महाबळेश्वर हा घाटरस्ता जातो. वाईपासून आग्नेयेस १० किमी.वर या रांगेतील वैराटगड हा डोंगरी किल्ला आहे. महाबळेश्वरपासून सुरू होऊन वैराटगडरांगेला साधारण समांतर आग्नेय दिशेने विस्तारित झालेली, हातगेघर-आरळे ही डोंगररांग असून तिच्यामुळे कुडाळी व वेण्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. या रांगेत डोंगरी किल्ला नाही. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाच्या पूर्व भागात, उत्तरेस महाबळेश्वरपासून सुरू होऊन दक्षिणेस सुमारे ६४ किमी. अंतरापर्यंत सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जवळजवळ समांतर गेलेली, बामणोली-घेरादातेगड ही सह्याद्रीची एक प्रमुख रांग आहे.