"मुस्लिम सण आणि उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
'''(२) शब्बे मेराज''' - इस्लामी वर्षाचा सातवा महिना "रज्जब" या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसाची रात्र ही शब्बे मेराज म्हणून साजरी केली जाते. मेराज म्हणजे आरोहण करणे. या रात्री प्रेषितांना बुराख नावाच्या पंख असलेल्या घोड्यावर बसवून स्वर्गात अल्लाच्या समक्ष नेण्यात आले असे मानले जाते. ही घटना प्रेषितांच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. एके रात्री मक्का येथील मशिदीत प्रेषित झोपले असताना देवदूत गॅब्रिएल तेथे आला. प्रेषिताना घेऊन येण्याची अल्लाचा (ईश्वराचा) त्याला आदेश होता. प्रथम देवदूताने त्यांना मक्केपासून दूर असलेल्या जेरुसलेम या पवित्र नगरीत नेले. तेथे प्रेषितांनी दुसऱ्या अनेक प्रेषितांबरोबर नमाज अदा केली. तेथे असलेल्या एका प्रचंड दगडावरून बुराख या घोड्यावर स्वार होऊन त्यांना स्वर्गात नेण्यात आले. वाटेत त्यांना अब्राहाम, मोशे, येशू असे अनेक प्रेषित भेटले. तसेच त्यांना नरकाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर त्यांना अल्लाच्या समक्ष हजर करण्यात आले. अल्लाने त्यांना विचारले ," तू मला कोणती भेट आणली आहेस.?" तेव्हा प्रेषित म्हणाले, " मी इबादत (प्रार्थना) आणली आहे." त्यांच्या या उत्तरावर खुश होऊन अल्लाने जाहीर केले की, " हा माझा प्रेषित आहे." व त्यांना वर मागण्यास सागितले. महंमद म्हणाले, " मला स्वतःकरिता काही नको, पण माझे अनुयायी पापी आहेत त्यांना तुझी कृपा मिळू दे." अल्लाने तसे करण्याचे कबूल केले. परंतु अल्ला त्यांना म्हणाला, " मी त्यांच्यावर कृपा करीन पण त्यांनी रोज पन्नास वेळा नमाज पढला पाहिजे व वर्षातून सहा महिने उपवास केले पाहिजेत." तेव्हा प्रेषित म्हणाले , माझे अनुयायी अशक्त आहेत त्यांना इतके नमाज व उपवास जमणार नाहीत." तेव्हा अल्लाने सागितले, " ठीक आहे त्यांनी रोज पाच वेळा नमाज पढावा व वर्षातून एक वेळा उपवास करावा. म्हणजे त्यांना रोज पन्नास वेळा नमाज पढल्याचे व सहा महिने उपवास केल्याचे पुण्य लाभेल." अशा रीतीने अल्लाची कृपा प्राप्त करून प्रेषित बुराख घोड्यावर बसून मक्केला परत आले.
 
'''(३) शब्बे बरात'''(किंवा शब-ए-बारात) - इस्लामी दिनदर्शिकेचा आठवा महिना 'शबान' या महिन्याच्या चवदाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. 'बरात' म्हणजे संरक्षणाची हमी आणि 'शब' म्हणजे रात्र. या रात्री प्रार्थना केल्यास आपल्या भविष्याच्या बाबतीत संरक्षणाची हमी मिळते, अशा कल्पनेने या रात्रीला शब्बे बरात असे म्हणतात. ही रात्र प्रार्थना व जागरण करून घालविली जाते. या रात्री ईश्वर प्रत्येक माणसाच्या पुढील आयुष्यातील घटनांची नोंद करीत असतो अशी समजूत आहे. म्हणून अशा वेळी प्रार्थना केल्यास आपल्या भवितव्यात चागलेच लिहून ठेवले जाईल असे मानले जाते. या सणाच्या रात्री सतत कुराणाचे पठण व जागरण करावे असे सांगितले आहे. काही लोक या दिवशी आपल्या नातेवाइकाच्या कबरीजवळ जाऊन प्रार्थना करतात. व कुराणातील अल फातिहा ही प्रार्थना म्हणतात. या दिवशी मृतात्म्यांना नरकातून मुक्ती मिळते अशी मान्यता असल्याने ही प्रार्थना केली जाते. शिया पंथाचे मुस्लिम हा दिवस इमाम मेहदीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. आणि हसन, हुसेन हे जे हुतात्मे होऊन गेले त्यांचे स्मरण करतात.
 
'''(४) रमझान''' - रमझान (रमझान-उल मुबारक) हा इस्लामी दिनदर्शीकेचादिनदर्शिकेचा नववा महिना आहे. हा उपवास करण्याचा महिना आहे. प्रत्येक मुस्लिमाने आचरल्याच पाहिजेत अशा ज्या मुलभूतमूलभूत गोष्टी आहेत, त्यातत्यांत रमझान महिन्यातील सर्व दिवस उपवास ही एक आहे. या महिन्यातले पहिले चंद्रदर्शन ज्या संध्याकाळी होईल त्यानंतर उजाडणाऱ्या सकाळपासून या महिन्यातील उपवास सुरुसुरू होतो. रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते. रमझान महिन्यानंतर सुमारे ७० दिवसांनी येणाऱ्या बीजेला ईद-उल जुहा किंवा बकरीद म्हणतात.
 
[[वर्ग:इस्लाम धर्म]]