"प्रभाकर मांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. प्रभाकर मांडे (जन्म : सावखेड-अौरंगाबाद जिल्हा) हे लोकसाहित्य...
(काही फरक नाही)

२२:२०, १२ मे २०१८ ची आवृत्ती

डाॅ. प्रभाकर मांडे (जन्म : सावखेड-अौरंगाबाद जिल्हा) हे लोकसाहित्य या अभ्यास शाखेला विद्यापीठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर अधिकाधिक जाणते करणारे संशोधक आहेत. त्यांचे शिक्षण मिलिंद महाविद्यालयात झाले.

प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रात या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना एकत्र आणले. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजितकेल्या आणि या परिषदांमधून डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. दुर्गा भागवत, डॉ.रा.चिं. ढेरे आदी विद्वानांचे मार्गदर्शन तरुण अभ्यासकांना मिळवून दिले. त्यांच्यामुळे लोकसाहित्य परिषद ही एक चळवळच महाराष्ट्रात सुरू झाली.

डाॅ. मांडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप)
  • गावगाड्याबाहेर
  • मांग आणि त्यांचे मागते
  • मौखिक वाङ्मयाची परंपरा
  • लोकगायकांची परंपरा
  • लोकमानस रंग आणि ढंग
  • लोकरंगभूमी
  • लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी
  • लोकसाहित्याचे अंतःप्रवाह
  • लोकसाहित्याचे स्वरूप