"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
डॉ. '''मधुकर केशव ढवळीकर''' (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते.
 
पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागात]] त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते.
 
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे तढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष [[संशोधन]] होते. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]]वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
 
मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते .
 
==महाभारताचा काळ--
मधुकर केशव ढवळीकर यांनी संशोधन करून महाभारताच्या युद्धाचा काळ इ.स.पू. ८५० एवढाच ठरवला आहे. ते सिद्ध करणारा त्यांचा एक लेख [https://www.loksatta.com/vishesha-news/era-of-mahabharat-1224271/ येथे आहे]
 
==ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके==