"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] [[भगवती|भगवती देवीची]] विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. [[वासंतिक नवरात्र|वासंतिक नवरात्रात]] [[चैत्र शुद्ध प्रतिपदा]] ते [[चैत्र शुद्ध नवमी|चैत्र शुद्ध नवमीपर्यंत]] व [[शारदीय नवरात्र|शारदीय नवरात्रात]] [[आश्विन शुद्ध नवमी|आश्विन शुद्ध नवमीपर्यंत]] देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे असे वाटते.[[भारत|भारता]]मध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.<ref>ढेरे रा.चिं., देवीकोश खंड पहिला (पृ..२२६),१९६७ </ref>
दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातूनग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेलंकेलेले आढळते.
[[File:Mahisasura Mardini.jpg|thumb|नवरात्री उत्सव दुर्गापूजा]]
 
ओळ १२:
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.[[पावसाळा]] बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात [[भोंडला]] खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.[[घट|घटामध्ये]] [[नंदादीप]] प्रज्वलित करून [[ब्रह्मांड|ब्रह्मांडातील]] [[आदिशक्ति]]-[[आदिमाय|आदिमायेची]] मनोभावे पूजा करणे, म्हणजेच '''घटस्थापना''' किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी [[ब्रह्मांड|ब्रह्मांडा]]त मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.
 
'''कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असतॆ, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.'''
 
*व्रत- नवरात्र हे एक काम्य [[व्रत]] आहे.पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते.[[आश्विन]] शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात.तिथे एक वेदी तयार करतात.नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात.मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात.यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात.व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते.आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते.या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात,घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.क्वचित होमहवन व बलिदानही करतात.नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात.शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड चौथा </ref>काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे.