"मालवणी बोली साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्...
(काही फरक नाही)

०१:३१, १९ मार्च २०१८ ची आवृत्ती

मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन रविवार १३ मे २०१८ रोजी कणकवलीतील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ नाटककार तथा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आहेत. सिंधुभूमी कला अकादमीने या संमेलनाचे प्रायोजकत्व स्वीकारले असून अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार हे स्वागताध्यक्ष असतील.

मालवणी बोली संमेलनाची सुरुवात १९९३ मध्ये दोडामार्ग-आडाळी येथे करण्यात आली. त्यानंतर चार संमेलने झाली. पाचवे संमेलन कणकवली नगरीत होत आहे. ४थ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर होते.