"गुलाम दस्तगीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गुलाम दस्तगीर हे एक संस्कृत पंडित आहेत. पंडित गुलाम दस्तगीर बिरा...
(काही फरक नाही)

००:०२, ५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

गुलाम दस्तगीर हे एक संस्कृत पंडित आहेत. पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले.

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमधून भाषांतरित केला आहे. ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत.

गुलाम दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदाच्या ऋचांचा समावेश होता.

गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी लिहिलेली पुस्तके

  • वेदादि-शोधबोध

पंडित गुलाम गुलाम दस्तगीर यांना मिळालेले पुरस्कार (एकूण १८हून अधिक)

  • उज्जैनहून परशुरामश्री
  • तिरुपतीहून वाचस्पती
  • नाशिकहून विद्यापारंगत
  • वाराणसी येथून महापण्डित आणि पण्डितेंद्र
  • सोलापूरहून संस्कृतरत्नम्‌
  • पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी १९१८मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे २१-१-२०१८ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.


(अपूर्ण)