"स.गो. बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सदशिव गोविंद बर्वे (जन्म : तासगांव-सातारा, २७ एप्रिल १९१४: मृत्यमृत्यू : पुणे, ६ मार्च १९६७) हे एक मराठी सनदी अधिकारी होते.
 
स.गो. बर्वे यांचे वडील आधी उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३६ साली भारतात परत येउन अहमदाबादला ते उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले.
ओळ २०:
 
==पुण्याची पुनर्बांधणी करण्याचे अपुरे स्वप्न==
पुण्याच्या पुनर्वसनाची त्यांचीबर्व्यांची कल्पना भव्य होती. एवीतेवी सर्व वाहून गेलेच आहे तर पु्णे अधिक नियोजनबद्ध रीतीने पुन्हा नव्याने बनवावंबनवावे असा त्यांचा आग्रह होता. दिल्ली आणि चंदीगडचे नियोजन त्यांच्यासमोर होते. सनदी अधिकारी फक्त सुचवू शकतात. शेवटी अदॊरदृष्टी राजकारण्यांनी ठरवले तसेच झाले. त्यांनी बर्व्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तत्कालीन परिस्थितीत लवकर होईल ते करायचे ठरले - त्यामुळे पुणे काही फार बदलले नाही. पण जे काही थोडेफार नियोजन झालंझाले ते लोकमान्यनगर - लाल बहादूर शास्त्री रस्ता आणि सहकारनगर येथील पुनर्वसनातून झाले.
 
==स.गो. बर्व्यांचा राजकारण प्रवेश==
यानंतर यशवंतराव चव्हाणांनी स.गो. बर्व्यांना थेट राजकारणात आणले. १९६२ च्या निवडणुकीत शिवाजीनगर - पुणे येथून ते आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा.
 
पुढे वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०,००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरु झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्ंनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले.
 
१९६७ मध्ये त्यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळचे विद्यमान खासदार व्ही.के. कृष्ण मेनन याना नाकारून कॉंग्रेसने बर्वे यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या मेनन यांनी अपक्ष लढायचे ठरवले. अपक्ष असूनही ते तुल्यबळ होते. पण अचानक शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर बर्व्यांना पाठींबा दिला अन बर्वे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात उद्योग खाते मिळाले असतं तर त्यांनी दूरगामी बदल घडवले असते हे निश्चित. दुर्दैवाने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याआधीच त्यांचे ६ मार्च १९६७ रोजी निधन झाले.
 
 
{{DEFAULTSORT:बर्वे,सदाशिव गोविंद}}
 
 
[[वर्ग:मराठी अधिकारी]]
[[वर्ग:पुणे महानगरपालिका]]
[[वर्ग:इ.स. १९१४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू]]