"कॅपिटॉल बाँबस्फोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चले जाव चळवळीच्या सुरुवातीलाच पुण्यातील कॅपिटॉल टॉकीजमध्ये सं...
(काही फरक नाही)

०७:३८, २७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

चले जाव चळवळीच्या सुरुवातीलाच पुण्यातील कॅपिटॉल टॉकीजमध्ये संपूर्ण देश हादरवून सोडणारा बाँबस्फोट झाला. हा स्फोट शिरुभाऊ लिमये आणि किसन वामन भातंब्रेकर यांची कामगिरी होती. २४ जानेवारी १९४३ रोजी हा स्फोट झाला. बाबुराव साळवी, बापू साळवी, एस.टी. कुलकर्णी, आणि शिरुभाऊ लिमये या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इंग्रजांना हिसका दाखविण्यासाठी जोरदार धडाका करण्याचा निश्चय केला.

भास्कर कर्णिक या तरुणाने खडकी येथील दारुगोळा कारखान्यातून आणलेल्या बाँबचे टाईम बाँबमध्ये रूपांतर करताना बापू डोंगरे आणि निळूभाऊ लिमये जखमी झाले होते. शिरुभाऊ लिमये, रामसिंग परदेशी, हरिभाऊ लिमये आणि दत्ता जोशी त्यांच्या मदतीला धावले. हे सारे कार्यकर्ते त्यावेळी पुण्यातल्या कसबा पेठेतील तांबट हौदाजवळ रहात असलेल्या किसन वामन भातंब्रेकर यांच्या घरी एकत्र जमत असत. या सर्वांची इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याविषयी हिरिरीने चर्चा होत असे. भातंब्रेकर त्या चर्चएत सहभागी असत.


(अपूर्ण)