"संजय उपाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
* इंडेमाऊची गाणी (बालसाहित्य)
* गप्पाष्टक भाग १,२
 
==डॉ. संजय उपाध्ये यांच्या कवितेचा नमुना==
::आईची मम्मी झाली, चवीची यम्मी झाली
::बदलाचे फॅड झालं, वडलांचं डॅड झालं
::पतंगाचं काईट झालं, विमानाचं फ्लाईट झालं
::कावळ्याचं क्रो झालं, भावाचं ब्रो झालं
::पोळीचं फ्रँकी झालं, रुमालाचं हँकी झालं
 
::भाताचं राईस झालं, छानचं नाईस झालं
::श्शीचं शिट झालं, सामानाचं किट झालं
::स्थानकाचं स्टेशन झालं, सत्राचं सेशन झालं
::शांतीचं पीस झालं, बहिणीचं मिस झालं
::प्रत्येक मोठं छोटं झालं, खर्‍याचंही खोटं झालं
 
::प्रत्येक क्षण झुरणं आलं, जगणंसुद्धा मरणं झालं
::यावरती पर्याय काही, नुसतं रडणं उपाय नाही
::एक उपाय आहे त्यावर, पहिलं तुझं रडणं आवर
::चोवीस तास प्रसन्न रहा, मग काय होईल ते पहा
::अरे तुझी भाषा बदलेल, मातृभाषेतच आशा जन्मेल.
 
== बाह्य दुवे ==