"यशवंत चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कॉम्रेड यशवंत चव्हाण (जन्म : इ.स. १९२१; मृत्यू : २४ जानेवारी २०१८) हे...
(काही फरक नाही)

२०:५१, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

कॉम्रेड यशवंत चव्हाण (जन्म : इ.स. १९२१; मृत्यू : २४ जानेवारी २०१८) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ कामगार नेते होते. त्यांना भारतातील १९४२च्या ‘चलेजाव’च्या चळवळीच्या समर्थनावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.

कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी नवजीवन संघटना, सेवा श्रमिक संघ, एनटीयूआय (न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह) या कामगार संघटनांची स्थापना केली. 'लाल निशाण' या पक्षाच्या काही संस्थापकांपैकी ते एक होते.

'लाल निशाण' हा पक्ष २०१७ साली १८ ऑगस्टला भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन करण्यात आला.