"प्रभाकर नारायण परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. प्रभाकर नारायण परांजपे हे पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख होते. शुद्धलेखनाविषयी जागरूकता, मराठी प्रतिशब्द निर्मिती व त्यांचा उपयोग या क्षेत्रात प्र.ना. परांजपे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मराठीचा सर्वांगीण विकास करणे; लोकव्यवहार आणि ज्ञानव्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढविणे; तसेच मराठी लोकांच्या भाषिक गरजा पुरविणे ही उद्दिष्टे समोर ठेवून स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषद' ह्या संस्थेचे ते अध्यक्ष, तसेच संस्थापक सदस्य आहेत. मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित होणार्‍या 'भाषा आणि जीवन' ह्या त्रैमासिकाचे ते प्रमुख संपादक आहेत. त्यांची अनुवाद, कथालेखन आणि संपादनपर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 'कविता दशकाची', 'कविता विसाव्या शतकाची' ह्या संपादित प्रकल्पांचे ते संयोजक होते. (प्रकल्पाचे अन्य संपादक : शांता शेळके, वसंत आबाजी डहाके व नीलिमा गुंडी).
 
प्रा. प्र.ना परांजपे हे एक [[नाट्यसमीक्षक]]ही आहेत.