"बीदरचे मकबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बिदर शहरातून बाहेर पडले की सगळीकडे दख्खनचे मोकळे पठार दिसू लागत...
(काही फरक नाही)

२१:००, १ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

बिदर शहरातून बाहेर पडले की सगळीकडे दख्खनचे मोकळे पठार दिसू लागते. षराबाहेर साधारणपणे साडेतीन मैल गेले की दूरवर भव्य मकबरे दिसू लागतात. हे १२ मकबरे आहेत. त्यांतील प्रत्येक मकबरा भव्य आहे. त्यांच्यापैखी काहींची ही माहिती :-

हजरत खलील उल्लाह दर्गा

बिदर शहराबाहेरचा आऊटर रिंग रोड ओलांडला की डावीकडे एका छोट्याश्या टेकडीवजा उंचवट्यावर असलेली ही वास्तू चौखंडी या नावाने प्रसिद्ध आहे. हा सुंदर दर्गा माळरानावरील झाडीत वसलेला आहे. एक प्राचीन भव्य अष्टकोनी इमारत, आणि जीर्ण बांधकाम हे या दर्ग्याचे वर्णन. आजूबाजूला सगळा मोकळा आणि शांत निसर्ग, दूरवर पसरलेला हिरवागार माळ.वा आणि वर आकाश. दर्ग्याच्या आतल्या छताची उंची ६० ते ७० फूट आहे. दर्ग्यावर एक घुमट आहे आणि आत एक पीर (कबर). दर्ग्यामध्ये नैसर्गिक प्रकाश झिरपण्याची आणि खेळती हवा वाहण्याची अतिशय सुंदर सोय केलेली आहे. मुख्य द्वाराच्या भोवती आणि आजूबाजूला कधीकाळी रंगीबेरंगी रत्नांचे सुंदर नक्षीकाम असावे.

दर्ग्यातील पीराची (मजारची) रोज पूजा केली जाते. एक दिवा तेथे अखंड तेवत असतो. सर्वच धर्माचे लोक येथे प्रार्थना करायला आणि दुवा मागायला येतात.

अहमद शाह वली मकबरा

सुलतान अल्लाउद्दीन शाह (दुसरा) याचा मकबरा

सुलतान हुमायूंचा मकबरा

(अपूर्ण)