"उर्वशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
उर्वशी पुढे पुरूरव्याची पत्नी झाली. ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे.
 
[[महाभारत|महाभारतात]] वनपर्वात [[अर्जुन]] व [[उर्वशी|उर्वशीमधील]] संवाद येतो. [[उर्वशी]] ही कुरुवंशातील राजा [[पुरूरवा|पुरुरव्याची]] पत्‍नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर [[उर्वशी]]चा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर [[उर्वशी]] सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर." अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन [[उर्वशी]] त्याला शाप देते. हा शाप पुढे [[अर्जुन#बृहन्नडा|बृहन्नडेच्या]] रूपाने खरा ठरतो.
 
ऋग्वेदातही पुरूरवा-उर्वशी संवाद आहे (ऋग्वेद १०/९५). पुरूरवा करुणपणे तिची विनवणी करीत असताना ती त्याला परत जाण्यास सांगते. तिला त्याची जराही दया येत नाही. अठरा ऋचांच्या या सूक्ताची सुरुवातच मुळी “हये जाये मनसा तिष्ठ” अशा विनवणीने होते. हे निष्ठुर पत्नी, जरा थांब! पुरूरव्याला नकार देताना पंधराव्या ऋचेत उर्वशी “न वै स्त्रैणानि सख्यानि” असा उपदेशही करते. स्त्रियांशी मैत्री करू नये असे सांगणारी उर्वशी नक्की कशी आहे हे समजण्यास या सूक्ताची मदत होते.
 
[[अरुणा ढेरे]] यांनी उर्वशीवर एक कादंबरी लिहिली आहे.
 
रवींद्रनाथ टागोरांची उर्वशीवर एक कविता आहे. [[पु.शि. रेगे]] यांचीही या विषयावर एक कविता आहे.
 
हिन्दी कवी रामधारीसिंह ‘दिनकर’ यांचे उर्वशीवरील महाकाव्य आहे.
 
 
अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन [[उर्वशी]] त्याला शाप देते. हा शाप पुढे [[अर्जुन#बृहन्नडा|बृहन्नडेच्या]] रूपाने खरा ठरतो.
 
[[वर्ग:अप्सरा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उर्वशी" पासून हुडकले