"उढेवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उढेवाडी हे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे सोळा-सतरा कि...
(काही फरक नाही)

००:००, २८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

उढेवाडी हे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे सोळा-सतरा किलोमीटरवर अतिशय दुर्गम ठिकाणी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे ७८ घरांचे गाव आहे. गावाची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास असून १९६७ मध्ये येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली.

पहिल्या निवडणुकीपासून ग्रामपंचायतीचे सभासद बिनविरोध निवडून येत आहेत. गावाची वस्ती बहुतांशी आदिवासी, प्रामुख्याने आदिवासी महादेव कोळी व पाणभरे कोळी.. मात्र, जातीच्या दाखल्यांअभावी येथील ग्रामस्थ सरकारच्या योजनांपासून वंचित राहत होते. निवडणुकांमध्ये आरक्षण जाहीर होते. मात्र जातीचे दाखले नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणी होत्या. या अडचणींमुळे निवडणुकीतही सहभागी होता येत नव्हते. यामुळे २००३ ते २०१३ या दहा वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. मात्र, या काळातही ग्रामस्थांनी सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत दुर्गम ठिकाणी विविध विकासकामांना चालना दिली आहे. गावातील बहुतांश नागरिक हे गरीब व आदिवासी असतानाही ते कसलेही आढेवेडे न घेता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एक एप्रिलला शंभर टक्के कर भरणा करीत नावलौकीक मिळवला आहे.