"रा.श्री. मोरवंचीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. रा. श्री. मोरवंचीकर (जन्म : चिंचोली-सोलापूर जिल्हा, ६ डिसेंबर १९...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

२२:०१, २५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. रा. श्री. मोरवंचीकर (जन्म : चिंचोली-सोलापूर जिल्हा, ६ डिसेंबर १९३७) हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक आहेत.

मोरवंचीकर औरंगाबाद विद्यापीठा’तून ‘प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती’ विभागाचे विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. उमेदीच्या काळात त्यांनी तेर (तगर), पैठण (प्रतिष्ठान) येथे वास्तव्य केले आणि पुढे औरंगाबाद येथे. ज्या ज्या स्थानी जाऊ त्या स्थानाचा भूगोल आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये शोधणे हा त्यांचा ध्यास असे. त्यातूनच ‘दक्षिण काशी पैठण’, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’, ‘जैनांचे सांस्कृतिक योगदान’, ‘युगानुयुगे चांदवड’, ‘देवगिरी-दौलताबाद येथील जलव्यवस्थापन’ यांसारखे अनेक विषय त्यांनी हाताळले. औरंगाबाद विद्यापीठाला नवीन ओळख मिळवून द्यावी या हेतूने पैठण, दौलताबाद, वेरूळ परिसरात त्यांनी उत्खनन सुरू केले. इतिहास-पुरातत्त्वाबरोबर ‘भारतीय जलसंस्कृती’ या विषयावरील त्यांचा ग्रंथ व ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’ हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले.

‘भारतीय जलसंस्कृती’ या ग्रंथाबरोबरच ‘पैठण : थ्रू द एजेस्, ‘पैठणी - तंत्र व वैभव’, ‘देवगिरी-दौलताबाद अॅन आर्किऑलॉजिकल व्ह्यू’, ‘वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया’ यांसारखे ग्रंथ त्यांच्या अभ्यासाचे वेगळेपण सांगणारे आहेत. ‘भारतीय जलसंस्कृती स्वरूप आणि व्याप्ती’ या ग्रंथात त्यांनी इतिहास व संस्कृतीचे साधन म्हणून पाणी या विषयाचा अभ्यास केला. असे करताना विविध स्थापत्ये, त्यांची वैशिष्ट्ये अगदी प्रागैतिहासिक काळापासून वर्तमानापर्यंत मानवनिर्मित साधनांचा आढावा तर त्यांनी घेतलाच, शिवाय साहित्यिक संदर्भ, लोकस्मृती, रूढ परंपरा आणि अनुभवजन्य ज्ञानातून निर्माण झालेल्या जलसंवर्धनाच्या व सिंचनाच्या विविध पद्धतींचाही मागोवा घेतला. त्यामुळे भारतीय जलसंस्कृतीवरील त्यांचा ग्रंथ या विषयावरील स्वतःचे वेगळेपण सांगणारा ठरतो.

मोरवंचीकर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘सगुण-निर्गुण’ सदरात ज्ञानेश्वरीवर लिहीत असताना जनसामान्य आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान या विषयाच्या चिंतनातून त्यांनी ‘येई परतूनी ज्ञानेश्वरा’ हा ग्रंथ लिहिला.

मोरवंचीकरांचे ‘शुष्क नद्यांचा आक्रोश’ हे एक वेगळ्या पद्धतीने लिहिलेले पुस्तक आहे. सहसा आक्रमक न होणारे मोरवंचीकर या विषयावर लिहिताना मात्र आत्यंतिक तळमळीतून टोकाचे आग्रही व आक्रमक होताना दिसतात. भारतीय जीवनात रुजलेली नदीमातृक संस्कृती व तिचे वैशिष्ट्ये स्पष्ट करत असताना त्यांनी गोदा-कृष्णा, गंगा, नर्मदा या नदी खोऱ्यांतील नागरीकरण व सांस्कृतिक जीवनाचा आलेख रेखाटला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निसर्गदत्त प्रवाह, पर्यावरण याचा विनाश करण्याकडे वाढत चाललेली माणसाची प्रवृत्ती व आत्यंतिक हव्यासातून निर्माण होणारे प्रदूषण, यातून नद्यांचे नष्ट होत जाणारे अस्तित्व, याची चीड सरांच्या लेखनातून जाणवते. सरिता शाश्वत जलपुरवठा करीत असल्याने त्यांनी भारतीय संस्कृतीला जन्म दिला. पण आज आमच्यामुळे त्यांचे अस्तित्व केवळ भूगोलाच्या पुस्तकावरील निळ्या रेषांतून जाणवते. त्यांच्या मूळ रूपासाठी आम्ही सर्वांगीण प्रयत्न केले पाहिजे, ही त्यांची ओढ या ग्रंथात जाणवत राहते.

मोरवंचीकरांनी लिहिलेली पुस्तके

  • देवगिरी-दौलताबाद अॅन आर्किऑलॉजिकल व्ह्यू
  • भारतीय जलसंस्कृती स्वरूप आणि व्याप्ती
  • पैठणी - तंत्र व वैभव
  • पैठण : थ्रू द एजेस्
  • येई परतूनी ज्ञानेश्वरा
  • वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया
  • शुष्क नद्यांचा आक्रोश
  • सातवाहनकालीन महाराष्ट्र