"हनुमान फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हनुमान फळ हे रामफळसीताफळ यांच्या जातीचेच एक फळ आहे. हनुमान...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
हनुमान फळ हे [[रामफळ]] व [[सीताफळ]] यांच्या जातीचेच एक फळ आहे. याचे शास्त्रीय नाव Annona Muricata आहे.
 
हनुमान फळ हे सीताफळाप्रमाणेच असले तरी आकाराने ओबडधोबड असते. ते फळ चवीला अननसाप्रमाणे आंबट-गोड असून त्याचा गर आइस्क्रीमसारखा मऊ असतो, त्यामुळे तो चमच्याने खाता येतो. हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात.
 
एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड ते दोन किलोपर्यंत असते. एका झडालाझाडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा मौसम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो. महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्हयातील बार्शी आणि इंदापूर भागातून हनुमान फळे पुण्याच्या बाजारात येतात.
 
काही लोक हनुमान फळालाच लक्ष्मण फळ म्हणतात. पण लक्ष्मण फळाचा आकार लंबगोल असतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हनुमान_फळ" पासून हुडकले