"प्रदीप गुजराथी (रक्तदाते)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मनमाडमध्ये राहणारे प्रदीप गुजराथी हे एक कवी आहेत. ते दूरसंचार वि...
(काही फरक नाही)

२०:५०, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मनमाडमध्ये राहणारे प्रदीप गुजराथी हे एक कवी आहेत. ते दूरसंचार विभागात काम करतात.

रक्तदानाबाबत अनेक स्वयंसेवी संस्था जनजागृती करत शिबिरे आयोजित करतात. परंतु प्रदीप गुजराथी यांनी स्वतःला या सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. केवळ लोकांना रक्तदानाचे आवाहन न करता गुजराथी यांनी स्वत: १०० वेळा रक्तदान केले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी रक्तदात्याची सूचीही तयार केली असून त्यांचे या विषयावरचे रक्तदान..घोषवाक्य..उखाणे ..आणखी बरेच.. असणारे ऐक पुस्तक आहे.

गुजराथी आपल्या साहित्यकृतीतून नेहमीच रक्तदानाविषयी प्रबोधन करतात. उदा०
माझा वसा रक्तदानाचा, मी रक्ताचे दान मागतो,
तुम्हीसुद्धा करा रक्तदान, मी रक्ताचे वाण मागतो।

अशा त्यांच्या अनेक कविता ते शिबिरांत सादर करतात. रक्तदाता देवदूत ...जातात पळून यमदूत किंवा करा रक्तदानाची घाई ...वाचेल कुणाची तरी आई, अशी काही घोषवाक्येही त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी रक्तदानाविषयी उखाणे तयार केले आहेत. चंद्राभोवती आहे तारकांचे रिंगण ..रावांनी बांधलं आहे, रक्तदानाचं कंकण किंवा मंदिरात मंदिर शंकराचे मंदिर, त्याला आहे सोन्याचा कळस, रक्तदान करताना ...राव कधी करत नाही आळस. असली ही साहित्यकृती रक्तदानाबाबतची जनजागृती सर्व स्तरापर्यंत करण्यास उपयोगी पडते.