"नीला सत्यनारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय सनदी अधिकारी, लेखिका
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीला सत्यनारायण या एक निवृत्त सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्र...
(काही फरक नाही)

०३:३४, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

नीला सत्यनारायण या एक निवृत्त सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या.

नीला सत्यनारायण यांच्या सनदी अधिकारपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मुलकी खाते, गृुह खाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी खाते, वैद्यक, ग्रामीण विकास यांसारख्या अनेक खात्यांत प्रमुख पदांवर काम केले. याशिवाय त्या ऐक उत्तम मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.

नीला सत्यनारायण यांनी लिहिलेली पुस्तके

  • आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
  • एक दिवस जीवनातला (अनुभवकथन)
  • एक पूर्ण - अपूर्ण (माहितीपर)
  • ओळखीची वाट (कवितासंग्रह)
  • जाळरेषा (अनुभवकथन)
  • टाकीचे घाव
  • डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
  • मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
  • मैत्र (ललित लेख)
  • रात्र वणव्याची (कथा)
  • सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)


पुरस्कार

नीला सत्यनारायण यांना अनेक वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांपैकी काही पुरस्कार :-

  • चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार
  • टाकीचे घाव या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार (इ.स. २०१५)