"पांडुरंग पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत. ==पांडुरं...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत.
 
पर्यटनविश्वातील वाङ्‌मयनिर्मितीत भर घालणारे पाटणकर यांनी दुर्गभ्रमंतीपासून ते विदेशीभ्रमंतीपर्यंत मार्गदर्शन करणारी १८ पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकप्रिय दैनिकात त्यांनी पर्यटनावर एक हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. सह्याद्री आणि हिमालय या दुर्गापासून सुरू झालेली त्यांची पर्यटन वाङ्‌मयाची मजल गल्फ प्रदेश, युरोपभ्रमंती, आल्प्स भ्रमंती यांनी समृद्ध झाली आहे. वडिलांची पोस्टातील फिरतीची नोकरी बर्‍याच वेळा शिक्षणात अडचणी निर्माण करते, पण पाटणकर यांनी त्या नोकरीतील फिरतीचे सामर्थ्यात रूपांतर करून घेतले. त्या प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक महत्त्वाची प्रामुख्याने गड, कोट, किल्ले यांची निरीक्षणे त्यांनी केली. त्यावरच लेखनाचा श्रीगणेशा केला. लहानपणी त्यांना नेरळमध्ये राहण्याची संधी मिळाली कारण त्यांचे आजोळच नेरळ येथे होते. तेथूनच त्यांच्या पर्यटनलेखनाचा श्रीगणेशा झाला. त्यांना मिळालेली व्यवसायाची नोकरीही काहीशी पर्यटनाला उपयोगी पडणारी होती. तामिळनाडूमधील महाबलीपुरम्‌चे त्यांनी घडवलेले दर्शन हे अलौकिक आहे. कारण महाबलीपुरम् येथील बहुतेक शिल्पे ही एकाश्म दगडातील आहेत म्हणजे एकाच दगडात शेकडो मूर्ती साकारलेल्या असतात. तेथील अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाबलीपुरमही मूर्तीनिर्माण, मंदिरनिर्माण आणि शिल्पनिर्मिती यांची काशी समजली जाते. हजारो वर्षांपूर्वींची ही कला तेथे अद्ययावत पद्धतीने जोपासली जाते. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांचे शिलास्मारक आणि तेथेच शेजारी असणारा तिरुवलूवरचा पुतळा ही महाबलीपुरम् येथील स्थापत्यशास्त्राची निर्मिती आहे. बारा वर्षांपूर्वीच्या त्सुनामी लाटेत पूर्वेकडील एक हजार किमी लांबीच्या किनार्‍यावरील एकही वास्तू वाचली नाही पण आत समुद्रात असणार्‍या या वास्तू मात्र वाचल्या.
 
==पांडुरंग पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके==