"प्रार्थना समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १:
'''प्रार्थना समाज''' या संस्थेची स्थापना डॉ. [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग]], [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]] व [[भास्कर पांडुरंग तर्खडकर|भास्कर पांडुरंग]] या तीन तर्खडकर बंधूंनी दिनांक [[३१ मार्च]], [[इ.स. १८६७]] रोजी [[मुंबई]]त केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. [[मुंबई]]तले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात [[वल्लभभाई पटेल]] रोड (जुने नाव सँडहर्स्ट रोड) आणि [[विठ्ठलभाई पटेल]] रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे.
 
==इतिहास==
‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हा सुमारे सातशे पृष्ठांचा द्वा. गो. वैद्य यांनी यांनी शब्दबद्ध केलेला ग्रंथ, समाजाच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून १९२७ मध्ये प्रकाशित झाला होता. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अल्पवयीन विवाहाला विरोध, हुंडा प्रथेला बंदी आणि अस्पृश्यता निवारण अशा विविध क्षेत्रांत देशाच्या पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज प्रबोधन आणि समाज सुधारणेमध्ये मूलगामी स्वरूपाचे योगदान देणाऱ्या या संस्थेचा इतिहास, प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून नव्या स्वरूपात लिहिला जात आहे, त्यासाठी मुंबईची एशियाटिक सोसायटी योगदान देत आहे. पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या ९० वर्षांपूर्वीच्या ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
==प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर व्यक्तिमत्त्वे==
Line ११ ⟶ १४:
* विकास काटदरे
* अभय पारसनीस
* सरोजिनी कराडे
 
==स्तूप==