"नारायणराव बोडस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पं. नारायणराव बोडस (मृत्यू : पुणे, २७ नोव्हेंबर २०१७) हे ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते. भारदस्त आवाज आणि बोलक्या चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती. लक्ष्मणराव बोडस हे त्यांचे वडील आणि शंकरराव बोडस काका. ह्या दोघांनीही [[विष्णू दिगंबर पलुस्कर]] यांनी स्थापलेल्या गांधर्व महाविद्यालयाची पताका फडकवत ठेवण्याचे फार मोठे काम केले. माहीत नसलेल्या कराची प्रांतांमध्ये जाऊन गुरुजींच्या आज्ञेला शिरसावंद्य मानणाऱ्या या दोन्ही बंधूंनी तेथे संगीत विद्यालय स्थापन करून संगीताची अखंड सेवा केली. शंकरराव बोडस यांची कन्या म्हणजे वीणा सहस्रबुद्धे आणि पुत्र काशिनाथ हेही संगीताच्या प्रांतात आपले स्थान पक्के केलेले कलावंत.
 
थेट पंडित [[विष्णू दिगंबर पलुसकर]] यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचं संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच, प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. 'सौभाग्यरमा' या डॉ. [[बी.एन. पुरंदरे]] लिखित नाटकापासून गायक नट म्हणून त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात झाली. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीतसाधना केली. दाजी भाटवडेकर यांना नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले आणि त्यांनी लगेच 'संगीत शारदम्' या संस्कृत नाटकासाठी नारायणरावांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. संस्कृत नाटक 'संगीत सौभद्रम्', पासून ते मराठी नाटके - 'पती गेले गं काठेवाडी', 'बुद्ध तिथे हरला', 'सं. मृच्छकटिक', 'सं. महाश्वेता', 'सं. मानापमान', 'सं. स्वयंवर', 'सं. सौभद्र', 'सं. संशयकल्लोळ' अशा अनेक संगीत नाटकांत त्यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या. त्यांचे गाणे आणि अभिनय दोन्ही कसदार होते. ते रागदारी गायक होते. मात्र असे असूनही त्यांनी नाटकातील गाणे कधी रेंगाळू दिले नाही.
 
वयाची साठी पूर्ण झाल्यावर १९९३ साली नारायणरावांनी रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी गोव्यात झालेला ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग त्यांचा अखेरचा ठरला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६पासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत होते.

सध्या त्यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा सांगितिकसांगीतिक वारसा पुढे नेत आहेत.
 
==गणपतराव बोडस यांची भूमिका असलेली नाटके==