"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर १९४४; मृत्यू : पुणे, ७ नोव्हेंबर २०१७) या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला.
 
सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. [[त्र्यंबकराव जानोरीकर]] यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. घराण्याचीशिस्तबद्ध गायकी आत्मसात केल्यावर सुहासिनीताईंना अचानक प्रकृतीच्या विविध तक्रारींनी घेरले. त्यांना सातत्याने कफतालीम, सर्दी,गुरूंचे ताप,उत्तम थंडीचामार्गदर्शन त्रासआणि सुरूस्वतःची झाला.निरंतर त्यांचीसाधना फुप्फुसेयांच्या कमजोरआधारे असल्यानेया पूर्णघराण्याची दमाचेवैशिष्टय़पूर्ण आणीगायकी पूर्णही श्वासाचेत्यांनी घराणेदारयशस्वीपणे गायनआत्मसात त्यांना झेपणार नाही, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेकेली. पण गुरूंच्या मार्गदर्शनावर आणि स्वत:च्या साधनेवर विश्वास ठेवत ओंकारसाधना, प्राणायामाने सुहासिनीताईंनी प्रकृतीवर मात केली.
 
==बिघडलेल्या तब्येतीवर मात==
==सुहासिनीबाईंची संगीतसाधना==
भेंडीबाजार घराण्याच्या गायकीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सुहासिनीताईंना अचानक प्रकृतीच्या विविध तक्रारींनी घेरले. त्यांना सातत्याने कफ, सर्दी, ताप, थंडीचा त्रास सुरू झाला. त्यांची फुप्फुसे कमजोर असल्याने पूर्ण दमाचे आणि पूर्ण श्वासाचे घराणेदार गायन त्यांना झेपणार नाही, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. पण गुरूंच्या मार्गदर्शनावर आणि स्वत:च्या साधनेवर विश्वास ठेवत ओंकारसाधना, प्राणायामाने सुहासिनीताईंनी प्रकृतीवर मात केली.
 
==सुहासिनीबाईंची संगीतसाधना आणि संगीतातली पीएच.डी.==
घराण्याचे वैभव आपल्या गायकीतून समर्थपणे साकारणाऱ्या डॉ. सुहासिनी कोरटकर यांच्या गानसेवेमुळे भेंडीबाजार हे काहीसे दुर्लक्षित राहिलेले घराणे पुन्हा संगीताच्या मुख्य प्रवाहात आले.
 
आपल्या सुरेल गुंजन आणि मिंडयुक्त आलापींनी रागाचे यथार्थ, सुडौल आणि परिणामकारक रूप त्या रसिकांसमोर साकारत. बंदिशींचे आकर्षक प्रस्तुतीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि गमकयुक्त ताना ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग या गानप्रकारांमध्येही त्यांची गायकी खुलायची. दिल्लीच्या प्रसिद्ध ठुमरी गायिका नैनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचे मार्गदर्शन घेतले. हिंदी व मराठीत अभंग, गीत, गझल यांना त्यांनी संगीतबद्ध केले. ‘संगीताचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली.
 
केवळ शास्त्रीय गायिका म्हणून स्वत:ची कारकीर्द घडविण्यापेक्षाही सुहासिनी कोरटकर या मुक्त हस्ते विद्यादान करून अनेक शिष्य घडविणाऱ्या गुरू आणि ‘निगुनी’ या टोपणनावाने अनेक उत्तमोत्तम बंदिशी बांधणाऱ्या विशेष व्यक्ती होत्या.