"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर १९४४; मृत्यू : पुणे, ७ नोव्हेंबर २०१७) या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला.
 
सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. [[त्र्यंबकराव जानोरीकर]] यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. घराण्याची गायकी आत्मसात केल्यावर सुहासिनीताईंना अचानक प्रकृतीच्या विविध तक्रारींनी घेरले. त्यांना सातत्याने कफ, सर्दी, ताप, थंडीचा त्रास सुरू झाला. त्यांची फुप्फुसे कमजोर असल्याने पूर्ण दमाचे आणआणी पूर्ण श्वासाचे घराणेदार गायन त्यांना झेपणार नाही, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. पण गुरूंच्या मार्गदर्शनावर आणि स्वत:च्या साधनेवर विश्वास ठेवत ओंकारसाधना, प्राणायामाने सुहासिनीताईंनी प्रकृतीवर मात केली.
 
==सुहासिनीबाईंची संगीतसाधना==
घराण्याचे वैभव आपल्या गायकीतून समर्थपणे साकारणाऱ्या डॉ. सुहासिनी कोरटकर यांच्या गानसेवेमुळे भेंडीबाजार हे काहीसे दुर्लक्षित राहिलेले घराणे पुन्हा संगीताच्या मुख्य प्रवाहात आले.
 
केवळ शास्त्रीय गायिका म्हणून स्वत:ची कारकीर्द घडविण्यापेक्षाही सुहासिनी कोरटकर या मुक्त हस्ते विद्यादान करून अनेक शिष्य घडविणाऱ्या गुरू आणि ‘निगुनी’ या टोपणनावाने अनेक उत्तमोत्तम बंदिशी बांधणाऱ्या विशेष व्यक्ती होत्या.
 
==सुहासिनी कोरटकरांची गुरुभक्ती==
गुरूबद्दलचा अपार श्रद्धाभाव हे वैशिष्ट्य असलेल्या सुहासिनीताई यांनी पं. [[त्र्यंबकराव जानोरीकर]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा गायक कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. गानवर्धन या संगीत प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थेकडे त्यासाठी त्यांनी देणगी दिली होती.