"बाबा पार्सेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
रंगायनच्या ’कावळ्यांची शाळा’ या तेंडुलकर लिखित नाटकाच्या नेपथ्यासाठी बाबांना राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळाले, आणि त्यांची कारकीर्द जोमाने सुरू झाली.
 
पुढे नंदकुमार रावतेंच्या ललितकला साधना संस्थेतून त्यांनीपार्सेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या ‘सागर माझा प्राण’ या १९६४ साली रंंगभूमीवर आलेल्या नाटकाचे वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. तिथून सुरू झालेला बाबा पार्सेकरांचा प्रवास त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीतही थांबलेला नव्हता.
 
रंगभूमीच्या संकेतांच्या चौकटीत राहून बाबांनी अनेक कल्पक नेपथ्यरचना केल्या. त्यांना रंगभूमीच्या मर्यादांचेही पक्के भान होते. त्या सांभाळूनच त्यांनी नेपथ्यात कल्पक प्रयोग केले. मुख्य धारेतील रंगभूमी ही सत्तर-ऐंशीच्या दशकात नाटकांच्या दीर्घ दौऱ्यांसाठी प्रसिद्ध होती. अशा दौऱ्यांत सुटसुटीत आणि लवचिक नेपथ्य ही प्राथमिक गरज असते. ते हाताळायला सोपे असणे गरजेचे असे. आखुडशिंगी, बहुगुणी अशा नेपथ्याचे आव्हान बाबा पार्सेकरांनी त्या काळी आणि नंतरही लीलया पेलले. नेपथ्यकार नाटकाचा नेपथ्यरचना करताना त्याचे आधी ड्रॉइंग तयार करतात. परंतु बाबा पार्सेकर ड्रॉइंगऐवजी नेपथ्याचे ‘मॉडेल’च तयार करीत; जेणेकरून निर्मात्यासह सर्वानाच नेपथ्याची पुरेपूर कल्पना येई. त्यांनी केलेल्या सुटसुटीत नेपथ्यामुळे ‘सुयोग’च्या ‘श्री तशी सौ’ या नाटकाचा अमेरिका दौरा सोपा झाल्याचे नेपथ्यकार राजन भिसे सांगतात. मात्र नेपथ्यात वास्तवतेचा अतिरेक त्यांना मान्य नव्हता. रंगमंचीय कॢप्त्या वापरून केलेले नेपथ्यच त्यांना भावत असे. पुढल्या काळात प्रगत तंत्रज्ञान आले आणि सर्जनशीलता कमी झाली. पण बाबा पार्सेकरांचे नेपथ्य सर्जनशीलच राहिले.
 
== इतर ==
हे [[श्रीधर पार्सेकर]] हे त्यांचे चुलतभाऊ आहेत.
 
==बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य असलेली काही नाटके (एकूण नाटके ४८५ हून अधिक)==
Line २० ⟶ २२:
* मला उत्तर हवंय
* रथचक्र
* श्री तशी सौ
* सागर माझा प्राण
* सूर राहू दे