"देवराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
 
पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलीबाबाच्या गुहाच आहेत. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची ही अखेरची विश्रामगृहे समजली जातात. त्यांचा अभ्यास करताना [[वा.द. वर्तक|डॉ. वर्तकांना]] १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व उमगले आणि त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले. <ref name="loksatta.com"/>
डाॅॅ. [[माधव गाडगीळ]] हे देवराईच्या अभ्यासाचे प्रणेते मानले जातात.
 
भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यात देवरायांची संख्या अधिक आहे.या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडुळांच्या जाती तेथे सापडतात. कर्नाटकातील काही देवरायांमध्ये पामच्या दुर्मीळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते.
ओळ ४९:
*[[वाघजाईची देवराई]]
*
==पुस्तके==
* 'देवराई' या विषयावर उमाकांत चव्हाण यांचे एक छोटे पुस्तक आहे.
* याच विषयावर 'देवराई' नावाचा [[सुमित्रा भावे]] यांनी काढलेला एक पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट आहे.
 
== हेही पाहा ==
* [[निसर्गरक्षणाच्या परंपरा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/देवराई" पासून हुडकले