"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q475279
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील आठवा महिना आहे. कार्तिक महिन्यात [[पंढरपूर]] येथे [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायाची]] वारी भरते. हा महिना ३० दिवसांचा असतो.
 
कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष.
 
==कार्तिक महिन्यात येणारे सण==
===शुक्ल पक्ष : ===
प्रतिपदा - हिला [[बलिप्रतिपदा]] म्हणतात. या दिवशी [[दिवाळी]]तला [[पाडवा]] असतो. या दिवशी [[विक्रम संवत|विक्रम संवताचे]] (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५७-५६ मिळवल्यास मिळतो) आणि जैन संवताचे (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५२७-५२६ मिळवल्यास मिळतो) नवीन वर्ष सुरू होते. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ क्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात.
 
द्वितीया - या दिवशी [[भाऊबीज]] आणि यम द्वितीया असते. याच दिवशी [[वाशीम]] जिल्ह्यातील डव्हा गावातल्या विश्वनाथबाबांची पुण्यतिथी असते. [[चित्रगुप्त]] देवाची पूजाही याच दिवशी असते.
 
तृतीया - [[विश्वामित्र]] जयंती.
 
पंचमी - पांडव पंचमी; कड पंचमी. जैनांची ज्ञान पंचमी. याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे तुळशीमाय पुण्यतिथी असते.
 
षष्ठी - सूर्य षष्ठी. डाला षष्ठी. [[वर्धा]] जिल्ह्यातील पळसगाव वाई गावात सखुबाई पुण्यतिथी; अकोला जिल्ह्यातील कोंडोली गावात [[मौनीमहाराज]] पुण्यतिथी.
 
सप्तमी - [[जलाराम]] जयंती. या दिवशी [[सहस्रबाहू]] जन्मोत्सव असतो.
 
अष्टमी - गोपाष्टमी. दुर्गाष्टमी; धुळे जिल्ह्यातील देवपूर गावात बापूजी भंडारी पुण्यतिथी.
 
नवमी - अक्षय नवमी; आवळे नवमी; कूष्मांड नवमी. या दिवशी [[नागपूर]]ला गोविंदबाबा रोंघे पुण्यतिथी असते.
 
दशमी - या दिवशी [[बुलढाणा]] जिल्ह्यातील जानेफळ गावात अवधूतानंदस्वामी यांची पुण्यतिथी असते.
 
एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंडरपूरची कार्तिक वारी. [[हिंगोली]] जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णुप्रबोधोत्सव. [[जळगाव]] येथे श्रीराम रथोत्सव. [[चतुर्मास|चातुर्मासातला]] शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी.
 
द्वादशी - [[पुरंदर]] तालुक्यातील गुळूंचे गावात ज्यतिर्लिंग काटेबारस.
 
त्रयोदशी - [[गोरक्षनाथ]] प्रकट दिन (?)
 
चतुर्दशी - वैकुंठ चतुर्दशी.
 
पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा. [[अमरावती]] जिल्ह्यातील बहिराम गावात बहिरामबुवांची यात्रा. क्षेत्र रामटेक येथे प्रभु रामचंद्र देवस्थान यात्रा. कार्तिकस्नान समाप्ती. स्नानदान पौर्णिमा. व्रत पौर्णिमा. [[गुरु नानक]] जयंती. तुळशीच्या लग्नांचा शेवटचा दिवस.
 
भारत सरकार प्रणीत भारतीय [[पंचांग|राष्ट्रीय पंचांगातील]] महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार '''{{लेखनाव}}''' हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणी तिसाव्या दिवशी २१ नोव्हॆंबर या तारखेला संपतो.
 
===कृष्ण पक्ष :===
 
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|कार्तिक|अश्विन|मार्गशीर्ष}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले