"लक्ष्मणराव इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लक्ष्मणराव इनामदार (जन्म : ऋषिपंचमी-२१ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुण...
(काही फरक नाही)

०४:५०, ८ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

लक्ष्मणराव इनामदार (जन्म : ऋषिपंचमी-२१ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुणे, १५ जुलै १९८५) हे सहकारभारती या संस्थेचे संस्थापक होते.

लक्ष्मणराव इनामदार हे मूळचे सातार्‍याचे होते. ते व त्यांची भावंडे असे मिळून सात भाऊ होते. भावांमध्ये ते तिसरे होते. शिवाय त्यांना दोन बहिणीही होत्या. लक्ष्मणराव वकिली करत असतानाच १९४३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून घराबाहेर पडले. गुजराथमधील नवसारी येथे त्यांनी प्रचारकाच्या कामाल सुरुवात केली. १९५२मध्ये ते गुजराथचे प्रांतप्रचारक झाले. त्यांनीच त्यांच्या कारकिर्दीत पुढे भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना संघात बालस्वयंसेवक म्हणून भरती केले होते.

राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्‍नांत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी, आणि या चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून लक्ष्मणरावांनी १९७८मध्ये सहकारभारती या संस्थेची स्थापना केली.

सहकारभारतीत आज २०१७ साली, भारतभरांतील ४०० जिल्ह्यांध्ये विखुरलेल्या २०,०००हून अधिक सहकारी संस्था आहेत.