"जैविक घड्याळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रत्येक सजीवाच्या शरीरात एक घड्याळ असते. ते पृथ्वीच्या गतीनुसार, म्हणजे सूर्योदय व सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन लेव्हलपातळी आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करते. या घड्याळाला जैविक घड्याळ म्हणतात. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व रात्रींसाठी अनुकूल झाले. औद्योगिक क्रांतीनंतर कामाच्या पाळ्यांमुळे व रात्रीच्या अधिक तासांच्या प्रवासांमुळे या घड्याळात बदल झाले.
 
शरीरातील जैविक घड्याळ दैनंदिन गतीवर कसे चालते, त्यासाठी पेशीत दिवसा आणि रात्री कसे बदल होतात यावर अनेक वर्षॆ, म्हणजे सन १९६०च्या दशकापासून संशोधन चालू होते. झाडे, प्राणी आणि माणसे पृथ्वीच्या गतीप्रमाणे आपल्या शरीरातील जैविक घड्याळात (बायोलॉजिकल क्लॉक) कसे बदल करतात, मानवी शरीरातील जैविक घड्याळाची काय कार्यपद्धती आहे याचा शोध सन १९८०पासून संशोधन करणार्‍या जेफ्री हॉल (७२), मायकेल रोसबॅश (७३) आणि मायकेल यंग (६८) या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. या शोधाबद्दल त्या तिघांना २०१७ सालचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे.
 
==या शास्त्रज्ञांनी नेमके काय केले?==
त्यांनी फळांवर बसणार्‍या माश्यांच्या शरीरातून जैविक घड्यळ नियंत्रित करणारे जनुक वेगळे केले. हे जनुक पेशींमधील एक प्रकारचे प्रथिन तयार करण्यास कारणीभूत असते. हे प्रथिन रात्री रात्री पेशींमध्ये साठून राहते व दिवसा लोप पावते. आणि त्यामुळे जैविक घड्याळ नियंत्रित राहते.
 
==शोधाचे महत्त्व==
निद्रानाश, वैफल्य व हृदयविकारांसारख्या अनेक व्याधींवरील उपाय शोधण्यास या शोधाची मदत मिळू शकते. तसेच कोणती औषधे दिवसाच्या नेमक्या कोणत्या वेळी घेतली म्हणजे अधिक परिणामकारक ठरू शकतात, याच्या अभ्यासासाठीही हे संशोधन उपयुक्त आहे. अनेक दिवस अनियमित झोप घेतल्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी व रात्री उशिरापर्यंत जगणार्‍या तरुणांवर इलाज करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होऊ शकतो.
 
 
Line ७ ⟶ १४:
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
 
[[वर्ग:वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:नोबेल पारितोषिक विजेते]]