"जैविक घड्याळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रत्येक सजीवाच्या शरीरात एक घड्याळ असते. ते पृथ्वीच्या गतीनुसा...
(काही फरक नाही)

१६:३३, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

प्रत्येक सजीवाच्या शरीरात एक घड्याळ असते. ते पृथ्वीच्या गतीनुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन लेव्हल आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करते. या घड्याळाला जैविक घड्याळ म्हणतात.

शरीरातील जैविक घड्याळ दैनंदिन गतीवर कसे चालते, त्यासाठी पेशीत दिवसा आणि रात्री कसे बदल होतात यावर अनेक वर्षॆ संशोधन चालू होते. झाडे, प्राणी आणि माणसे पृथ्वीच्या गतीप्रमाणे आपल्या शरीरातील जैविक घड्याळात (बायोलॉजिकल क्लॉक) कसे बदल करतात, मानवी शरीरातील जैविक घड्याळाची काय कार्यपद्धती आहे याचा शोध जेफ्री हॉल (७२), मायकेल रोसबॅश (७३) आणि मायकेल यंग (६८) या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. या शोधाबद्दल त्या तिघांना २०१७ सालचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे.