"मृच्छकटिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मृच्छकटिक हे शूद्रक कवीने लिहिलेले संस्कृत नाटक आहे. उज्जयिनी न...
(काही फरक नाही)

२३:४०, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

मृच्छकटिक हे शूद्रक कवीने लिहिलेले संस्कृत नाटक आहे. उज्जयिनी नगरातली गणिका वसंतसेना ही या नाटकाची नायिका आणि चारुदत्त हा नायक आहे.

या नाटकाच्या कथानकावर मराठीत ‘मृच्छकटिक’ हे अजरामर संगीत नाटक आणि त्याच नावाचा गजानन जहागीरदार यांनी १९४२ साली काढलेला मराठी चित्रपट निघाला. आचार्य अत्रे यांनीही वसंतसेना काढला होता.

याआधी १९२९ साली दादासाहेब फाळके यांनी वसंतसेना नावाचा चित्रपट काढला होता. याच नावाचा कानडी चित्रपट १९४१ साली, हिंदी चित्रपट १९४२ साली निघाले. वसंतसेना नावाचा तेलुगू चित्रपट १९६७ साली आणि तमिळ चित्रपट २०१४ साली निघाले.

मराठीतले नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिले होते. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं 'ललितकलोत्सव मंडळी’ने केला होता.

आजवर शांता मोडक, कीर्ती शिलेदार, वनमाला, कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर, मधुवंती दांडेकर या अभिनेत्रींनी मृच्छकटिक नाटकात नायिकेची भूमिका केली आहे.