"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विधान तपासून घेतलेले नाही.
(चर्चा | योगदान)
मनीशीतलगाथा (चर्चा)यांची आवृत्ती 1504849 परतवली.
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''अशोक सराफ''' हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घरांघरांत पोचला आहे. [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी ''सुपरस्टार'' आहेत. सिनेअभिनेत्री [[निवेदिता जोशी]] ह्या त्यांच्यासराफांच्या पत्नी. असून नाट्य‍अभिनेते [[रघुवीर नेवरेकर]] हे त्यांचे मामा होत.
 
==ओळख==
मूळचे [[बेळगांव|बेळगावचे]] असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म [[मुंबई|मुंबईत]] झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' [[ययाती आणि देवयानी (नाटक)|ययाती आणि देवयानी]] ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.
 
[[गजानन जागीरदार]] यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर [[दादा कोंडके]] यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_सराफ" पासून हुडकले