"प्रदीप लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रदीप लोखंडे (जन्म : इ.स. १९६३) हे महाराष्ट्रासह भारताच्या अन्य राज्यांच्या ग्रामीण भागांत ग्रंथालयांचे जाळे निर्माण करणारे एक समाज कार्यकर्ते आहेत. ते मूळचे [[वाई]]चे असून कॉमर्सचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे मार्केटिंगचा डिप्लोमा आहे आणि त्यांनी काही वर्षे जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीत काम केले आहे. कामाच्या निमित्ताने ते गुजराथ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांच्या बऱ्याच भागांत फिरले आहेत. फिरतीच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावागावांतून बराच डेटा गोळा केला आहे. उदाहरणार्थ, गावात किती दुकाने आहे, त्यांतून काय विकले जाते, किती घरांत टी.व्ही. आहेत, इंटरनेट किती लोक वापरतात, वगैरे वगैरे. हे सर्वेक्षण करताना प्रदीप लोखंडे यांच्या ध्यानात आले की गावांत अतिरिक्त ज्ञान मिळवण्याची काहीच साधने नाहीत. शाळेत नेमलेली क्रमिक पुस्तके सोडली तर कुठलीच पुस्तके लोकांनी वाचलेली नाहीत. लोखंड्यांनी ठरवले की आपण यासाठी काहीतरी केले पाहिजे.
 
प्रदीप लोखणडे यांनी माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालये बनवायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांनी चालविलेली विशेष ग्रंथालये. सन २००१मध्ये हे काम सुरू झाले. शाळेतला एक विद्यार्थी या ग्रंथालयाची व्यवस्था पहातो. २००९सालापर्यंत या कार्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गुजराथ, छत्तीसगड, तेलंगण, मध्य प्रदेश आदी राज्यांत पॊचला. प्रदीप लोखंडे यांनी ग्रंथालये तर उघडलीच, पण याशिवाय लोकांकडून देणग्या मिळवून २० हजार गावांत २८ हजार संगणक बसवले. गावांना पुरवण्यासाठी आज ते एकतर नवे संगणक विकत घेतात किंवा आयटी कंपन्यांतून जुने कालबाह्य झालेले संगणक मिळवतात.
 
आज, २०१७ साली प्रदीप लोखंड्यांनी उघडलेल्या ३६०० लायब्रऱ्या सुरू अाहेत. त्यांना ६,२५,००० पुस्तके दिली गेली आहेत. प्रत्येक लायब्ररीत १८०च्या आसपास पुस्तके आहेत. त्यांचा फायदा साडेआठ लाख मुले घेत आहेत. या पुस्तकांमध्ये मॅनेजमेन्ट, डिझास्टर मॅनेजमेन्ट, फिजिकल ट्रेनिंग, भारताची घटना यांविशयींची पुस्तके तर आहेतच पण नाटके, ललित लेखसंग्रह, इतकेच नाही तर लैंगिक शिक्षणावरची पुस्तकेही आहेत. विशेष म्हणजे ही पुस्तके देशी भाषांमधली आहेत. वाचनसंस्कृती वाढवणारी जगातली ही सर्वात मोठी यशस्वी योजना असल्याचे सिद्ध झाले आहे.
आज, २०१७ साली ३६ हजार शाळांत प्रदीप लोखंड्यांनी उघडलेल्या लायब्रऱ्या सुरू अाहेत; वाचनसंस्कृती वाढवणारी ही जगातली ही सर्वात मोठी कल्पना समजली जाते.
 
प्रदीप लोखंडे यांनी उभारलेल्या या दरेक ग्रंथालयाचा लाभ गावातले आणि आसपासच्या गावातले सरासरी २७० विद्यार्थी घेतात. एक ग्रंथालय स्थापन करण्यासाठी दात्याला प्रकाशकाच्या नावाने फक्त ६,७०० रुपयांचा चेक फाडावा लागतो. विकत घेतलेल्या पुस्तकावर दात्याचा नाव-पत्ता असतो. पुस्तक आवडले तर विद्यार्थी थेट दात्याला पोस्ट कार्ड टाकून त्याचे आभार मानतात. प्रदीप लोखंड यांना व्याख्यानांसाठी मॅनेजमेन्ट स्कूल्समधून बॊलावणी येतात. त्यांना जगभरातल्या संस्थांमध्ये प्रॅक्टिकल मॅनेजमेन्ट स्ट्रॅटेजीवरील चर्चासत्रांमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रणे असतात. ते पुण्यात इतके प्रसिद्ध झाले आहेत की त्यांचा पोस्टाचा पत्ता केवळ 'प्रदीप लोखंडे, पुणे १३. हा झाला आहे.