"डेरा सच्चा सौदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डेरा सच्चा सौदा हा शीख पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन १९४८मध्ये...
(काही फरक नाही)

१६:४७, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

डेरा सच्चा सौदा हा शीख पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन १९४८मध्ये शाह मस्तानने स्थापन केला. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. हरियाणामधील पंचकुला येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. हे आश्रम समाजकार्य करतात. सिरसा गावात त्यांचे रुग्णालय आहे.

बाबा गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९०पासून प्रमुख आहेत.

२००७ साली बाबा राम रहीम यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या वेशात जनतेला दर्शन दिले होते, त्यावरून शीख समुदायांत मोठा गदारोळ उठला होता.

गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.

गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी लागण्याची शक्यता आहे. निकाल विपरीत लागला तर पंचकुलामध्ये मोठे दंगे झाले तर त्यासाठी खबरदारी म्हणून ११५ अर्धसैनिक बटालियन्स धरून ४३ तुकड्या, १० वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी, २५०० पोलीस, २००० होमगार्ड तैनात केले आहेत. दंगेखोरांची धरपकट झालीच तर त्यांना ठेवण्यासाठी चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचा तुरुंगासारखा वापर करता यावा, अशी व्यवस्था झाली आहे. पंचकुला शहरातील सर्व शाळा-कॉलेजे, सरकारी आणि खासगी कार्यालये त्या दिवशी बंद राहणार आहेत.