"वसंत सखाराम आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
पु्ण्यातील सारस बागेतील सुप्रसिद्ध - तळ्यातला गणपतीच्या मंदिराची पुनर्रचना वसंत आपटे यांनी केली. 
 
स्थापत्यशास्त्राचा व्यवसाय करत असताना सचोटी, प्रामाणिकपणा व कायद्याच्या चौकटी न मोडण्याची त्यांची तत्त्वे त्यांनी निरंतर पाळली. गल्लाभरू व्यावसायिकतेपासून ते अर्थातच दूर राहिले. पण त्याचा फायदा त्यांना सामाजिक कार्य करणाऱ्यासंस्थांना मिळाला. वास्तु आरेखन शास्त्राऐवजी वास्तुशास्त्र या संकल्पनेबद्दल ते नाराज होते. ते म्हणत, - 'दक्षिणेकडे प्रवेशद्वार असले तर वाईट होते असे असेल तर लक्ष्मी रस्त्याच्या उत्तरेकडची दुकाने ओसाड आणि दक्षिणेकडची दुकाने ग्राहकांनी ओसंडून वाहायला हवीत.!'  
 
==ग्रामविकासाचे कार्य==
ओळ १६:
==अध्यापन आणि लेखन==
अभिनव महाविद्यालयाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये वसंत आपटे अनेक वर्षे अध्यापनाचे काम करीत. त्यांच्याच विषयावर योग्य मार्गदर्शक पुस्तक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी 'आर्किटेक्चरल प्रॅक्टिस अॅन्ड प्रोसीजर' नावाचे पुस्तक लिहिले. आपटे यांनी सुचवलेली किंत फार कमी अहे या सबबीखाली प्रकाशकांनी हे पुस्तक छापायला नकार दिला. तेव्हा त्यांनी स्वतःच त्या पुस्तकाचे प्रकाशन व वितरण करून आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे हित सांभाळले. या पुस्तकास पुणे विद्यापीठासहित भारतातील अनेक विद्यापीठांची पाठ्यपुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे.  
 
==चित्रकला, संगीत आणि वास्तूच्या रचनेतील बारकाव्यांवर लेखन ==
आपल्या व्यवसायातून वेळ काढून वसंत आपटे यांनी चित्रकला व संगीत हे छंद जोपासले.  भारतात व भारताबाहेर हिंडताना स्थानिक वास्तुरचनेतील पारंपरिकतेचे बारकावे ते चित्रबद्ध करू लागले. कोकणातील उतरते छप्पर असो किंवा जैसलमेरमधील वैशिट्यपूर्ण गवाक्षे असोत, ही विविधता त्यांच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांत उमटली. या विषयावर त्यांनी दृक्‌श्राव्य व्याख्यानेही दिली.
 
हे असे बहुआयामी वसंत सखाराम आपटे, ७ जानेवारी २०१४ पर्यंत कार्यरत होते. त्या दिवशी, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी ते राजकोट येथील विद्यालयात द्यावयाच्या व्याख्यानाची तयारी करीत होते. त्या सकाळी त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि मेंदूत झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचे निधन झाले.