"सहजानंद सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्वामी सहजानंद सरस्वती (१८८९-१९५०) हे राष्ट्रीय चळवळीतील मोठे ने...
(काही फरक नाही)

२१:०४, ७ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

स्वामी सहजानंद सरस्वती (१८८९-१९५०) हे राष्ट्रीय चळवळीतील मोठे नेते होते. उत्तर प्रदेश आणि बिहार हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. दशनामी आखाड्याचे संन्यासी आणि शेतकऱ्यांचे नेते ही त्यांची विशेष ओळख. सहजानंद सरस्वती संस्कृत पंडित आणि मोठे लेखक होते. त्यांचे भगवद्गीतेवरचे आगळेवेगळे भाष्य प्रसिद्ध आहे. याखेरीज गीता आणि मार्क्सवाद यांचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक ग्रंथही आहे. त्यांची एकूणच ग्रंथसंपदा मोठी आहे. स्वामीजींचा वैचारिक प्रवास शंकराचार्य ते मार्क्स असा होता. गीतेतच खरा मार्क्सवाद आणि साम्यवाद सापडतो अशी त्यांची भूमिका दिसते. नेताजी सुभाषचंद्र बोस ते कॉ. नंबुद्रीपाद अशी त्यांना आदर देणाऱ्यांची ' रेंज ' आढळते. पूर्व-मीमांसा, वेदाान्त, भागवत, शंकराचार्य, मार्क्सवाद, गांधीवाद आणि शेतकऱ्यांसाठी झटणारा कॉम्रेड असा चौफेर आवाका असणाऱ्या माणसाचे गीताभाष्यही तसेच खास आहे. या भाष्याचे अॅपही उपलब्ध आहे. भाष्यग्रंथांच्या आधारे नव्हे तर जीवनानुभवाच्या आधारे गीता समजते हे त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे.

'अखिल भारतीय किसान सभा' या संघटनेचे बीज त्यांच्या कार्याने रोवले, असे म्हटले जाते.

गीताहृदय

हे स्वामी सहजानंद सरस्वतींचे गीतेवरील भाष्याचे नाव होय. भाष्याचे दोन खंड असून शिवाय परिशिष्टे आहेत. सन १९४१ ते १९४२ या काळात कारावासात असताना त्यांनी ते लिहिले. इ.स. १८८९ मधील जन्म इ.स. १९५० मधील मृत्यू